शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 20:04 IST

JDU नेत्याच्या मुलासह चौघांचे तुकडे-तुकडे झाले, मृतदेह पोत्यात भरुन नेले. पाहा धक्कादायक LIVE व्हिडिओ...

पाटणा: जिभेवर कधीही वाईट शब्द आणू नका, असे म्हटले जाते. कारण वाईट बोलल्याने कधी-कधी ती गोष्ट तुमच्यासोबत घडू शकते. बिहारमधील डॉक्टर आणि जेडीयू नेत्याचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांसोबत अशीच घटना घडली आहे. ते पूर्वांचल द्रुतगती मार्गावर ताशी 230 किमी वेगाने त्यांची BMW कार पळवत होते. गाडी पळवण्याचा लाईव्ह व्हिडिओही त्यांनी फेसबुकवर शेअर केला. 

गाडीतील चौघांचा मृत्यूलाईव्ह व्हिडिओमध्ये गाडीतील एक व्यक्ती म्हणतो, 'स्पीड वाढव. चौघेही मरतील.' काही वेळात तेच घडलं आणि भरधाव कार कंटेनरला धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यूपीच्या सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात डॉ. आनंद कुमार (रा.देहरी) यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील निर्मल कुमार हेदेखील डॉक्टर तसेच जेडीयू नेते आणि औरंगाबाद लोकसभेचे प्रभारी आहेत.गाडीचा चक्काचूर झालाकुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. आनंद कुमार शुक्रवारी सकाळी डेहरीहून उत्तर प्रदेशातील फैजाबादला रवाना झाले होते. त्यांचे मोठे काका, माजी प्रमुख हिरालाल सिंह यांचे जावई दीपक कुमार, मित्र अखिलेश सिंह आणि भोला कुशवाह त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये सोबत होते. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर सुलतानपूरजवळ कंटेनरची धडक बसल्याने बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला. यात आनंद कुमार यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.

फेसबुक लाईव्हवर गाडीचा वेग दाखवलाआनंद कुमार आणि त्याचे साथीदार बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. यावेळी गाडीतील दीपक कुमारने फेसबुक पेजवर लाइव्ह व्हिडिओ सुरू केला आणि यामध्ये कारचा वेग दाखवला. गाडी चालवणारा व्यक्ती हळुहळू वेग वाढवत होता आणि एक पॉइंटवर गाडीचा वेग तासी 230 पर्यंत पोहोचला. यानंतर काही वेळातच त्यांची कार कंटेनरला धडकली. वेग जास्त असल्याने कारचा पूर्ण चक्काचूर झाला. बीएमडब्ल्यू कंटेनरमध्ये शिरली. कारमधील सर्व प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून न्यावे लागले. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातDeathमृत्यू