बिहारमध्ये दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 19:29 IST2015-10-16T19:28:13+5:302015-10-16T19:29:48+5:30
बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले

बिहारमध्ये दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १६ - बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून अकरा वाजेपर्यंत मतदान करण्यास येणा-या मतदारराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नाही. त्यानंतर काही प्रमाणात मतदारांचा ओघ दिसून आला. दुस-या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत म्हणजेच पाच वाजेपर्यंत ३२ जागांसाठी एकूण ५५ टक्के मतदान झाले. यात ५७ टक्के महिलांनी तर ५२ टक्के पुरुषांनी मतदान केले.
दुस-या टप्प्यातील ३२ मतदार संघापैकी सर्वाधिक जास्त मतदान कैमूर या मतदारसंघात झाले. कैमूरमध्ये ५७ टक्के झाले, तर औरंगाबाद (५२ टक्के), रोहतास (५४ टक्के), गया (५५ टक्के), जहानाबाद (५६ टक्के) आणि अरवलमध्ये ५२ टक्के मतदान झाले.
दरम्यान, गेल्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत याच ३२ जागांसाठी ५२ टक्के झाले होते.