शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरता ही विषासमान, तिला कोणतीही सीमा नाही - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 16:34 IST

पाकिस्तानात गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर काल (दि.3) संध्याकाळी स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही हा घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे. 

"नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेला हल्ला निंदनीय आहे आणि त्यांचा निषेध केलाच पाहिजे. कट्टरता ही धोकादायक आणि जुने विष आहे, तिला कोणतीही सीमा नाही. प्रेम + एकमेकांचा आदर + समजणे हेच एकमेव औषध आहे." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनीही या घटनेचा निषेध ट्विटरवरून केला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानात गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे. तिचे पावित्र्य कायम राखण्यासाठी पाकिस्तान सरकारने योग्य ती पावले उचलावी असे भारताने म्हटले आहे. पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. 

नानकाना साहिब गुरुद्वारा प्रमुखाची मुलगी जगजीत कौर हिचे तिच्या घरातून अपहरण करून धर्मांतर करण्यात आल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा वाद धुमसत होता. या मुलीचे अपहरण केल्याचा ज्याच्यावर आरोप आहे त्या मुलाच्या कुटुंबीयांनी संतप्त जमावाचे नेतृत्व केल्याचे समजते. तसेच, नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक करणाऱ्यांवर पाकिस्तान सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी भारताने केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस