पठाणकोटमध्ये मोठी शोधमोहीम
By Admin | Updated: June 23, 2016 01:41 IST2016-06-23T01:41:10+5:302016-06-23T01:41:10+5:30
पठाणकोट हवाईतळावर हल्ला करण्यासाठी परिसरातील गावांमध्ये आणखीही अतिरेकी दबा धरून बसले असल्याने आणखी हल्ला होऊ शकतो

पठाणकोटमध्ये मोठी शोधमोहीम
पठाणकोट : पठाणकोट हवाईतळावर हल्ला करण्यासाठी परिसरातील गावांमध्ये आणखीही अतिरेकी दबा धरून बसले असल्याने आणखी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गृहमंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने मंगळवारी दिल्यानंतर बुधवारी पठाणकोट परिसरात पंजाब पोलिसांनी शोधमोहीम उघडली. सुमारे २८ गावांमधील प्रत्येक घराची कसून झडती घेण्यात आली.
याबाबत पठाणकोटचे एसएसपी राकेश कौशल यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे ५ वाजताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. २८ गावांतील प्रत्येक घरात जाऊन चौकशी केली. गावातील कोणी एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहिले काय, असा प्रश्न प्रत्येकाला विचारण्यात आला. त्यापैकी प्रत्येकाने अशा व्यक्तीला पाहिले नाही, असे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)