शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठा दिलासा! पक्षाची बँक खाती पुन्हा सुरू केली, आयटी न्यायाधिकरणाने पुढील सुनावणीपर्यंत बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:56 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेस पक्षाची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तंखा यांनी माहिती दिली.

'आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने बुधवारपर्यंत काँग्रेस पक्षाच्या खात्यांवरील फ्रीझ उठवली आहे, याआधी, काँग्रेसचे अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती आणि २१० कोटींच्या वसुलीची मागणी करण्यात आली होती. 

केंद्र सरकारवर मोठा आरोप! काँग्रेसची सर्व बँक खाती गोठविली; पगार द्यायलाही पैसे नाहीत

पुढची सुनावणी बुधवारी होणार

अजय माकन म्हणाले, 'आम्ही आयकर अपीलीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे आणि आमच्या वतीने ज्येष्ठ वकील विवेक तंखा उपस्थितीत आहेत.'बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे.  आम्ही आमची बाजू आयकर अपील न्यायाधिकरणासमोर मांडली. आता काँग्रेसची सर्व खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत, पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

याआधी पक्षाचे खजिनदार अजय माकन म्हणाले होते की, पक्षाच्या युवा शाखा इंडियन युथ काँग्रेसच्या खातीही गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण नऊ खाती गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अजय माकन म्हणाले, 'भारतात लोकशाही धोक्यात आहे, १४ फेब्रुवारी रोजी आम्हाला माहिती मिळाली की आम्ही जारी करत असलेले धनादेश बँका स्वीकारत नाहीत. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. आता बुधवापर्यंत ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली नसून देशातील लोकशाही गोठवली आहे, असा आरोपही अजय माकन यांनी केला. 'काल संध्याकाळी भारतीय युवा काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे २१० कोटी रुपयांची वसुलीची मागणी केली होती, असंही अजय माकन म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा