शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 11:50 AM

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी अनेक नियम बदलणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात बँकिंग सेक्टरमध्ये मोठे बदल होऊ लागले आहेत. 30 सप्टेंबर म्हणजेच आज मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या (Debit-Credit Card) एका खास सेवेमध्ये बदल केले जाणार आहेत. ही सेवा बंद केली जाणार आहे. याचाच अर्थ उद्यापासून ही सेवा ग्राहकांना मिळणार नाही. यासाठी देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI आणि HDFC बँकांनी ग्राहकांना मेसेजही पाठविले आहेत. 

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी अनेक नियम बदलणार आहे. ही सेवा आंतरराष्ट्रीय व्यवहाराशी जोडलेली आहे. कोरोना संकटामुळे बँकांना आरबीआयने नवे नियम लागू करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत दिली होती. या नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डवरून व्यवहार करण्यासाठी आता वेगळी प्राथमिकता सांगावी लागणार आहे. 

ICICI-SBI ने पाठविला मेसेजICICI बँकेने ग्राहकांना वेगवेगळे मेसेज पाठविले आहेत. या मेसेजनुसार आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ऑनलाईन ट्रान्झेक्शन बंद केले जाणार आहे. जर तुम्हाला ही सुविधा हवी असेल किंवा वापरायची असेल तेव्हा ती इनेबल म्हणजेच सुरु करून केवळ ७ दिवसांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी सुरु ठेवण्यासाठी INTL नंतर कार्ड नंबरचे शेवटचे चार आकडे टाईप करून 5676791 वर SMS करावा लागणार आहे. एसबीआयनेही ग्राहकांना असाच मेसेज पाठविला आहे. 

RBI च्या गाईडलाईन काय सांगतात? आंतरराष्ट्रीय फसवणुकीमुळे आरबीआयने नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार ग्राहकांना त्यांच्याकडील कार्डचा वापर कशासाठी करायचा आहे ते स्पष्ट करावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर निवडावा लागणार आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच या सुविधा वापरता येणार आहेत. मात्र, यासाठी बँकेला सांगावे लागणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झेक्शन करताना देशांतर्गत वापराला परवानगी असणार आहे. तसेच ही सुविधा कार्डसोबतच मिळणार आहे. यासाठी बँकाच ग्राहकांचा आधीचा वापर लक्षात घेऊन त्यांना देण्याची सेवा ठरविणार आहेत. तसेच ग्राहकही बँकांना कळवून कोणती सेवा सुरु कोणती बंद करायची हे देखील सांगू शकणार आहेत. 

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाICICI Bankआयसीआयसीआय बँकhdfc bankएचडीएफसी