जगभरात नावाजलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09 सोडण्यासाठी PSLV-C61 रॉकेट लाँच केले होते. परंतू, तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचण आल्याने ते अपयशी ठरले आहे. याबाबतची माहिती ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली आहे.
पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी इस्रोने हा उपग्रह पाठविला होता. हा उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट दुसऱ्या टप्प्यापर्यंत सामान्यपणे कार्यरत होते. परंतू, तिसऱ्या टप्प्यात जाताना तांत्रिक अडचण उद्भवली. यामुळे हे रॉकेट उपग्रह निर्धारित कक्षेत पोहोचवू शकले नाही. यामुळे इस्रोचे हे १०१ वे मिशन अर्धवटच राहिले आहे.
तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे मिशन पूर्ण होऊ शकले नाही. आम्ही डेटा गोळा करत आहोत. त्याचे विश्लेषण करून पुन्हा या मोहिमेवर येऊ, असे नारायणन यांनी सांगितले.
हा उपग्रह पृथ्वीच्या सूर्य समकालिक कक्षेत (SSPO) ठेवला जाणार होता. तो उपग्रह EOS-04 ची पुढील अपडेट होता. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युजरना अचूक आणि नियमित डेटा प्रदान करण्यासाठी रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्याचा हेतू यामागे होता. हा उपग्रह दहशतवादी कारवाया, घुसखोरी किंवा संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता.