शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! येत्या 18 महीन्यात 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी, केंद्र सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी पदे भरण्याचे निर्देश संबंधित मंत्रालयांना दिले आहेत.

नवी दिल्ली: सरकारी नोकरीबाबत केंद्रातील मोदी सरकारने देशातील तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना येत्या 18 महिन्यांत 10 लाख भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने देशातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरत आहेत, यातच ही घोषणा झाल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 'पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतला असून, सरकारने पुढील 1.5 वर्षांत 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत,' अशी माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. आता हीदेखील पदे भरण्यात येतील, अशी आशा आहे.

केंद्रातील या विभागांमध्ये बहुतांश पदे रिक्त मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.3 लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण (नागरी) विभागात सुमारे 6.33 लाख कर्मचाऱ्यांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे 2.5 लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागामध्ये एकूण मंजूर 2.67 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 90,000 जागा रिक्त आहेत, तर महसूल विभागात, 1.78 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 74,000 रिक्त पदे आहेत आणि गृह मंत्रालयात मंजूर 10.8 लाख पदांपैकी सुमारे 1.3 लाख पदे रिक्त आहेत.

पंतप्रधानांच्या या घोषणेची काँग्रेसने उडवली खिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील दीड वर्षात 10 लाख तरुणांची भरती करण्याची घोषणा तरुणांमध्ये नवीन आशा आणि आत्मविश्वास आणेल. दरम्यान, पंतप्रधानांच्या घोषणेची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "बिली 900 उंदीर खाऊन हजला गेली", अशी टीका त्यांनी केली. 50 वर्षातील सर्वात वाईट रोजगार (दर) आपण अनुभवत आहोत, रुपयाचे मूल्य 75 वर्षातील सर्वात कमी आहे. पंतप्रधान कधीपर्यंत 'ट्विटर ट्विटर' खेळून आमचे लक्ष विचलित करणार आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUnemploymentबेरोजगारी