शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर राजदचे ७६ आमदार बंदिस्त; तीन बेपत्ता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 22:31 IST

Bihar Politics Latest news: राजदचे ७९ आमदार आहेत. पैकी ७६ जणच तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर आले आहेत. बाहुबलीची आमदार पत्नी दिल्लीला असल्याचे सांगत आहे...

बिहारमध्ये पलटुराम नितीश कुमार यांच्या भाजपसोबतच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अशातच जदयूचे आमदारा संपर्कात असलेल्या लालू प्रसाद यादवांना आज जोरदार धक्का बसला आहे. बाहुबली आनंद मोहन याच्या मुलासह त्यांची पत्नी व एक डझन आमदार संपर्काबाहेर गेले होते. यामुळे तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना आपल्या निवासस्थानी जमण्यास सांगितले होते. हे आमदार आल्यावर त्यांना बंगल्यातच कैद करून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

या आमदारांना आता बहुमत चाचणीच्या दिवशीच बाहेर पडायला मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे. तरीही तीन आमदार बेपत्ता झाल्याने नितीशकुमारांच्या बहुमत चाचणीत मोठा घोडेबाजार रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

राजदचे ७९ आमदार आहेत. पैकी ७६ जणच तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर आले आहेत. उरलेल्या तीनपैकी एका हे नितीश सरकारमध्ये मंत्री असल्याचे सांगितले जात आहे. राजद नेत्यांनी आमचे सर्व आमदार एकत्र जमले असल्याचा दावा केला आहे. नितीश कुमारांच्या बहुमत चाचणीला अपयशी ठरविण्यासाठी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. 

अनंत सिंह याची पत्नी नीलम देवी, मुलगा चेतन आनंद हे राजदपासून लांब झाले आहेत. यामुळे दुपारी ३ वाजता अचानक तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर पोहोचण्याचा फतवा काढण्यात आला. हा फतवा व्हीपप्रमाणे असल्याने चेतन आनंद तिथे पोहोचले. त्यांनी आपण पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे. 

कोण बेपत्ता...तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी नीलम देवी या अनुपस्थित आहेत. त्या दिल्लीत असल्याचे सांगत आहेत. परंतु सर्व पक्षांनी आमदारांना पाटण्यालाच थांबण्याचे आदेश दिलेले असताना त्या दिल्लीत काय करत आहेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. तर अन्य दोन बेपत्ता आमदारांत माजी मंत्री कुमार सर्वजीत आहेत. ते बोधगयाचे आमदार आहेत. तर तिसरे आमदार हे नॉट रिचेबल आहेत. ओरंगाबादच्या एका विधानसभा मतदारसंघाचे हे आमदार असून त्यांचा राजद नेत्यांना फोनच लागत नाहीय. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार