शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

'आप'ला 'धक्के पे धक्का', एकाच वेळी 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; लोकसभेपूर्वीच टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 16:23 IST

एकाच वेळी 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची साथ सोडली असून सर्वांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे.

दिल्ली आणि पंजाबनंतर, तिसऱ्या क्रमांकाचे मोठे समर्थन असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (आप) झटक्यावर झटके बसताना दिसत आहेत. आमदार भूपत भायाणी यांच्या राजीनाम्यानंतर, भरूचमध्ये एकाच वेळी 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची साथ सोडली असून सर्वांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे.

गुजरातमधील 'आप' प्रमुख इसुदान गढवी यांना अधिकृत पत्र लिहून मायनॉरिटी विंगचे अध्यक्ष अमजद खान पठान, 33 पक्ष कार्यकर्ते आणि 10 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनाम्याची घोषणा केली. महत्वाचे म्हणजे, विसावदर मतदार संघातील आमदार भूपत भायाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. देशगुजरातमधील वृत्तानुसार, सामूहिक राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे भरूचमधील जिल्हाध्यक्ष पीयूष पटेल म्हणाले, राजीनामा देणारे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपासूनच निष्क्रिय होते. यामुळे त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले नाही. एवढेच नाही तर, राजीनाम्यासाठी पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला आहे. ही बाब राज्य नेतृत्वासमोर ठेवली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये 5 जागा जिंकल्या होत्या. पक्षाला सुमारे 13 टक्के मते मिळाली होती. दिल्ली आणि पंजाबनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला गुजरातमध्येच सर्वाधिक मते मिळाली आहेत. यामुळेच लोकसभा निवडणुकीतही येथून पक्षाला मोठी अपेक्षा आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात एका आमदारासह अनेक नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपची साथ सोडत भाजप अथवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीGujaratगुजरातPoliticsराजकारण