बिग फाईट पदमपुरा जोड...
By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30
विजयाचा सर्वांनाच विश्वास

बिग फाईट पदमपुरा जोड...
व जयाचा सर्वांनाच विश्वासअपक्ष म्हणून मैदानात असलेले माजी महापौर गजानन बारवाल यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला. सुरुवातीपासून हा वॉर्ड माझाच आहे, त्यामुळे यावेळीही लोक मलाच निवडून देतील, असे ते म्हणाले. सेनेचे उमेदवार संजय बारवाल यांना हा वॉर्ड सेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे सेनेचाच विजय निश्चित वाटतो. अपक्ष उमेदवार सुनीता बरथुने यांनी आपल्याला मोची समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे, तसेच पाच वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत, त्यामुळे लोक नक्कीच निवडून देतील, असे सांगितले. तर काँग्रेसचे राहुल बारवाल म्हणाले, मी आतापर्यंत सामाजिक काम करीत आलेलो आहे, त्याच बळावर लोक मला निवडून देतील.