शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 20:39 IST

यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे.

विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. यात सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.

यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. आमचा उद्देश आहे ‘द्वेश मुक्त भारत’. "जुडेगा भारत, जीतेगा INDIA."

I.N.D.I.A च्या तिसऱ्या बैठकीत तयार करण्यात आल्या 5 समित्या -गेल्य 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये विरोधी आघाडीची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह एकूण 28 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत समन्वय व प्रचार समितीसह एकूण 5 समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

5 सप्टेंबरला झाली प्रचार समितीची बैठक -  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली 5 सप्टेंबरला दिल्ली येथे I.N.D.I.A च्या कॅम्पेन कमिटीची पहिली बैठक पार पडली. यात मध्य प्रदेशसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तयारीसंदर्भात चर्चा जाली. याच बरोबर, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशणासंदर्भातील रणनीतीवरही चर्चा झाली. 

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेElectionनिवडणूक