सध्या भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. याअंतर्गत भारतीय हवाई दल (IAF) मोठ्या प्रमाणावर 'स्कॅल्प' (SCALP) क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करत आहे. गेल्या वर्षी 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान याच क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला घाम फोडला होता आणि अक्षरशः गुडघ्यावर आणले होते. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी याच क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, या खरेदीवर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय हवाई दलाने, पाकिस्तानच्या मुरीदके आणि बहावलपूरमधील दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य करण्यासाठी 'स्कॅल्प' आणि 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे राफेल लढाऊ विमानांच्या सहाय्याने डागली होती. या हल्ल्यात ही तळे पूर्ण पणे नष्ट झाली. ६ आणि ७ मेच्या रात्रीच्या या यशस्वी मोहिमेनंतर, भारतीय हवाई दलाने आपला मोर्चा पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांकडे वळवला होता. या हल्ल्यात १२ प्रमुख एअरबेसह जमिनीवरील लढाऊ विमाने आणि गुप्तहेर विमानांसह अनेक दहशतवादी टार्गेट्स उद्ध्वस्त करण्यात आले होते.
हवाई दल सध्याच्या राफेल ताफ्यासाठी ही क्षेपणास्त्रे घेत असून, सोबतच 'मिटियर' (Meteor) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू आहे. ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदलासाठी येणाऱ्या २६ राफेल मरीन विमानांमध्येही बसवली जाणार आहेत.
महत्वाचे म्हणजे, 'ऑपरेशन सिंदूर'मधील राफेलच्या जबरदस्त कामगिरीनंतर, हवाई दल आता आणखी ११४ राफेल विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावही देणार आहे. या प्रस्तावाला लवकरच डिफेंस अॅक्विजिशन काउंसिलची (DAC) मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. ही विमाने भारतीय हवाई दलाचा कणा ठरतील. आगामी १० ते १५ वर्षांच्या काळात या विमानांची संख्या २०० वर पोहोचणे अपेक्षित आहे.
Web Summary : India considers a large missile deal with France after 'Operation Sindoor,' where 'SCALP' missiles struck Pakistani terror camps. The deal, worth ₹3200 crore, involves missiles for the Air Force's Rafale fleet. More Rafales may also be acquired, bolstering India's air power.
Web Summary : 'ऑपरेशन सिंदूर' के बाद भारत फ्रांस के साथ बड़े मिसाइल समझौते पर विचार कर रहा है, जिसमें 'SCALP' मिसाइलों ने पाकिस्तानी आतंकी शिविरों पर हमला किया था। ₹3200 करोड़ के इस सौदे में वायु सेना के राफेल बेड़े के लिए मिसाइलें शामिल हैं। भारत और राफेल विमान भी खरीद सकता है।