बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

By Admin | Updated: April 20, 2015 00:24 IST2015-04-20T00:24:31+5:302015-04-20T00:24:31+5:30

बिहारच्या दरभंगा स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस रविवारी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली. लाहेरीसराई

Big Contact of Bihar Contact Kranti Express was avoided | बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

दरभंगा : बिहारच्या दरभंगा स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस रविवारी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली. लाहेरीसराई स्थानकानजीक एक्स्प्रेसचे सात डबे उर्वरित गाडीपासून वेगळे झाले. बऱ्याच अंतरापर्यंत गेल्यावर चालकाला ही बाब लक्षात आली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.
तांत्रिक कारणामुळे ही घटना घडल्याचे कळते. दरभंगा रेल्वेस्थानक सोडल्यानंतर काही दूर अंतरावर या एक्स्पे्रसचे सात डबे उर्वरित गाडीपासून वेगळे झाले. रेल्वे चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने रेल्वे परत आणून हे सातही डबे पुन्हा गाडीला जोडले.


 

Web Title: Big Contact of Bihar Contact Kranti Express was avoided