शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: पंतप्रधान Narendra Modi आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार, मोठी घोषणा होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:37 IST

Prime Minister Narendra Modi News: तप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. त्यानिमित्त देशभरात काल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत भारतामध्ये कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोविडबाबतच्या पुढील टप्प्यातील लढाईचा आराखडा मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पंतप्रधान काय बोलतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहेत.

 

 100 कोटींचा लस उत्सव; कोरोनाविरोधातील लढाईत देशाने ओलांडला ऐतिहासिक टप्पाकोरोनाप्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला. अवघ्या दहा महिन्यांत भारताने ही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक डोस देण्यात आले असून, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डाॅ. राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले. तेथील लसीकरण केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि लसीकरणाबाबत चर्चा केली.  पंतप्रधानांनी या निमित्ताने देशभरातील सर्व  डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेदेखील होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस