बिग बॉसमधल्या पूजा मिश्राचा सामूहिक बलात्काराचा आरोप

By Admin | Updated: June 16, 2016 22:38 IST2016-06-16T22:38:13+5:302016-06-16T22:38:13+5:30

बिग बॉसच्या घरात राहिलेली पूजा मिश्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

Big Bowman Pooja Mishra's gang rape charges | बिग बॉसमधल्या पूजा मिश्राचा सामूहिक बलात्काराचा आरोप

बिग बॉसमधल्या पूजा मिश्राचा सामूहिक बलात्काराचा आरोप

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16- बिग बॉसच्या घरात राहिलेली पूजा मिश्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यावेळी पूजा मिश्रानं तीन जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. जयपूरमध्ये सुरू असलेल्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या कार्यक्रमासाठी पूजानं 3 व्हिडीओग्राफर खरेदी केले होते. 
खरेदी केलेल्या व्हिडीओग्राफरची मोसीन, सुहान आणि हरिश अशी नावे असून, त्यांना 8 हजार रुपये प्रतिदिन मानधन देणं ठरलं होतं. शूटिंगनंतर पूजानं या तिघांना हॉटेल ग्रँड उनियारमध्ये पार्टी दिली होती. यावेळी या तिघांनी मला नशीला पदार्थ देऊन माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पूजानं दिली आहे. सकाळी पूजाला जाग आल्यावर तिनं लागलीच पोलीस स्टेशन गाठलं आणि या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 या आधी पूजाचा हॉटेल स्टाफसोबत मारहाणीचा व्हिडीओही प्रसिद्ध झाला होता. दिल्लीत पूजानं काही तरुणांनी माझी छेडछाड केल्याचा आरोपाखाली मारहाण केली होती. 

Web Title: Big Bowman Pooja Mishra's gang rape charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.