"बिग बॉस" विजेत्याचं आत्महत्येचं "नाटक" FB Live
By Admin | Updated: April 6, 2017 16:58 IST2017-04-06T16:43:25+5:302017-04-06T16:58:40+5:30
अर्जुन भारद्वाज या विद्यार्थ्याने फेसबुक लाइव्हद्वारे मुंबईच्या एका हॉटेलच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक घटना

"बिग बॉस" विजेत्याचं आत्महत्येचं "नाटक" FB Live
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 6 - दोन दिवसांपूर्वी अर्जुन भारद्वाज या विद्यार्थ्याने फेसबुक लाइव्हद्वारे मुंबईच्या एका हॉटेलच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक घटना समोर आली आहे. "बिग बॉस कन्नड" सीजन 4 चा विजेता प्रथम याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रथमने केवळ प्रसिद्धीसाठी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. बंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासोबत त्याने सोशल मीडिया फेसबुकवर एक लाइव्ह व्हिडीओ पोस्ट केला होता.
त्या व्हिडीओत, मित्र लोकेश याच्यासोबत झालेल्या भांडणामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्याने म्हटलं आहे. लोकेशने आपलं शोषण केल्याचा आरोप प्रथमने केला. तसंच माझ्या नावाचा दुरूपयोग करून माझी बदनामी केली असा आरोप प्रथमने केला. "आत्महत्या करण्याचा मी कधी विचार केला नव्हता, लोकेश आणि माझे मित्र मला सुखाने जगू देणार नाहीत, माझ्या मृत्यूनंतरच यांना सगळ्यांना शिकवण मिळेल असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. याशिवाय आपल्याबद्दल चुकीच्या बातम्या टाकण्यासाठी मीडियालाही त्याने जबाबदार धरलं.
तर, पोलिसांच्या चौकशीत वेगळीत माहिती समोर आली आहे. प्रथमने रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या मित्रांकडून काही पैसे उधार घेतले होते., पण विजेता ठरल्यानंतरही त्याने उधार घेतलेले पैसे देण्यास नकार दिला. त्याचा मित्र लोकेश हा दिग्दर्शक आहे, त्याने याबबात प्रथमसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग फेसबुकवर टाकली, यामध्ये प्रथम पैसे परत करण्यास नकार देत होता. याशिवाय तो मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या आत्महत्येमुळेही प्रेरीत झाला होता असं म्हटलं आहे. पण त्याने लोकांची सहानुभूती मिळवण्ासाठी हा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.