शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका माजी मुख्यमंत्र्याने पक्ष सोडला, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:49 IST

काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता गोवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ फक्त तीनवर आले आहे.

गोवा: मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी काँग्रसमधून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर आता आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक(ravi naik) यांनी मंगळवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी नायक पोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रवी नाईक यांनी आज गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 37 आमदार राहिले आहेत. तर काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे. दरम्यान, रवी नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रसने गोवा विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

पक्षाच्या कामगिरीवर टीकापक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर फेलेरो यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, याला दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तसेच, फेलेरोंनी पत्रात गोवा काँग्रेसच्या अनेक बाबी उघड केल्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा