शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बडी धमाल! लफडेबाज नवरा परस्त्रीसोबत डबलसीट जात होता, घरी चलन आले अन् बायकोने पाहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:51 IST

एक तरुण पती त्याच्या स्कूटरवर बसवून प्रेयसीसोबत डबलसीटनं लांब लांब लांब गेला होता. यावेळी तो जरा जास्तच वेगात होता. यामुळे केरळच्या वाहतूक पोलिसांच्या स्पीड कॅमेरामध्ये आला आणि पोलिसांनी सामान्यपणे त्याच्या घरी चलन पाठविले.

वेगाची नशा उतरविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी स्पीड सेंसर कॅमेरे लावलेले आहेत. मुंबई, पुण्यातच नाही तर केरळमध्ये देखील आहेत. याच स्पीड सेन्सिंग कॅमेराने एका महिलेला तिच्या पतीचे लफडे पकडून दिले आहे. तुम्ही कधी विचारही केला नसेल की असेही कधी होऊ शकते. थिरुवअनंतपुरमध्ये एका नवऱ्याने घरी चांगली बेदम मार खाल्ला आहे. 

एक तरुण पती त्याच्या स्कूटरवर बसवून प्रेयसीसोबत डबलसीटनं लांब लांब लांब गेला होता. यावेळी तो जरा जास्तच वेगात होता. यामुळे केरळच्या वाहतूक पोलिसांच्या स्पीड कॅमेरामध्ये आला आणि पोलिसांनी सामान्यपणे त्याच्या घरी चलन पाठविले. आता हे चलन तो घरी नसताना त्याच्या बायकोच्या हातात पोस्टमनने ठेवले. मग काय पतीला घरी बोलवून घेतले आणि झाडूने झोड झोड झोडले. 

वाहतूक पोलिसांकडे 726 एआय इनेबल्ड कॅमेरे आहेत. या दोघांनीही हेल्मेटही घातले नव्हते. यामुळे वाहतुक पोलिसांनी त्यांचा फोटोच चलनावर छापला आणि तो त्याच्या घरी पाठवून दिला. ती स्कूटर त्याच्या पत्नीच्या नावे होती. तिने हा फोटो पाहिला आणि पत्नीला ती बया कोण असा सवाल केला.

सुरुवातीला त्याने ती महिला वाटसरू होती असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्नीने मारायला सुरुवात केली तेव्हा त्यानेही तिला मारहाण केली. तीन वर्षांच्या मुलालाही मारहाण केली. यामुळे हा प्रकार पुन्हा पोलिसांत पोहोचला आणि महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आली. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसKeralaकेरळ