शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'सिरम' इन्स्टिट्युटची मोठी घोषणा; भारतासह गरीब देशांना आणखी दहा कोटी डोसचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:27 IST

जगातील सर्व देश, आरोग्य व आर्थिक संस्थांनी एकत्रित येत प्रत्येकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..’

ठळक मुद्दे भारतासह जगभरातील ९२ देशांना ‘जीएव्हीआय’कडून लसीकरणासाठी सहकार्य केले जाणार

पुणे : बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन व जीएव्हीआय या संस्थेसोबत झालेल्या करारानुसार सिरम इन्स्टिट्युटकडून भारतासह अन्य गरीब देशांना कोरोना लसीचे आणखी दहा कोटी डोस पुरविले जाणार आहेत. या देशांना यापुर्वीही दहा कोटी डोस पुरविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एकुण २० कोटी डोसचा पुरवठा ‘सिरम’कडून या देशांना होणार आहे.   भारतासह जगभरातील ९२ देशांना ‘जीएव्हीआय’कडून लसीकरणासाठी सहकार्य केले जाणार आहे. या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने पहिल्या टप्यात सुमारे अकराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता आणखी ११०० कोटी रुपये देत लसीकरणासाठी मोठा वाटा उचलला आहे. त्याअंतर्गत सिरम इन्स्टिट्युटशी करार करण्यात आला आहे. त्यानुसार संस्थेने या देशांना १० कोटी लसींचे डोस पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आता आणखी १० कोटी डोसची भर टाकण्यात आली असल्याची माहिती ‘सिरम’कडून देण्यात आली. हे डोसही पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रति डोस सुमारे २२५ रुपयांना दिले जाणार आहेत. अ‍ॅस्टॉझेनेका आणि नोव्हावॅक्स दोन कंपन्यांच्या लसींचा पुरवठा होणार आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड ही लस यशस्वी ठरल्यास ६१ देशांना आणि नोव्हावॅक्सची परिणामकारकता सिध्द झाल्यास सर्व ९२ देशांमध्ये लसीचे वितरण केले जाणार आहे. याविषयी सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जीएव्हीआय आणि गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे भारतासह अन्य अल्प व मध्यम आर्थिक गटातील देशांना २०२१ मध्ये आणखी १० कोटी डोसचे उत्पादन व वितरण केले जाईल. जगातील सर्व देश, आरोग्य व आर्थिक संस्थांनी एकत्रित येत प्रत्येकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBill Gatesबिल गेटस