शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

नीट, नेट पेपर लीकप्रकरणी मोठी अ‍ॅक्शन; NTA च्या महासंचालकांची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 22:00 IST

एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

नीट आणि नेट सारख्या अतिमहत्वाच्या परीक्षांचे पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारवर टीका होत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटविण्यात आले आहे. प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवे संचालक असणार आहेत. खरोला हे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी होते. आता एनटीएची गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळविण्याचे काम खरोला यांना करावे लागणार आहे. 

नुकत्याच झालेल्या NEET आणि UGC-NET परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून एनटीएवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पेपरफुटीवरून सरकारवर विरोधकच नाही तर भाजपाची विद्यार्थी संघटना देखील आंदोलन करत होती. देशभरात विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे सरकार अॅक्शनमोडवर आले असून एनटीएच्या महासंचालकांवरच पहिली कुऱ्हाड कोसळली आहे. 

प्रवेश परीक्षा दोषमुक्त व्हाव्यात म्हणून एनटीएची स्थापना करण्यात आली होती. परंतू ही संस्था अपयशी ठरली आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना नेट परीक्षेचेही पेपर फुटल्याचे समोर आले होते. परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही परीक्षा रद्द केल्याची घोषणा सरकारला करावी लागली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१७ मध्ये उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकल, स्वायत्त आणि स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली होती. 1 मार्च 2018 ला एनटीएची स्थापना झाली होती.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल