शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 21:39 IST

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे.

West Bengal Rape-Murder Case :पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्याप्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अखेर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे. त्याला पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलमधूनही निलंबित करण्यात आले आहे.

आरजी कार हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरुन सोमवारी सीबीआयने संदीप घोषसह चार जणांना अटक केली होती. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

9 ऑगस्ट रोजी बलात्कार संदीप घोष आणि आरजी कार हॉस्पिटल सध्या वादात आहेत. 9 ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संदीप घोष यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. याप्रकरणी सीबीआयने त्याची अनेकदा चौकशीही केली आहे. सीबीआयने नुकतीच घोषची पॉलिग्राफी चाचणीही घेतली होती.

कोलकाता बलात्कार प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये निदर्शने सुरू आहेत. भाजपसह सर्व विरोधी पक्ष सातत्याने संदीप घोष याच्यावर कारवाईची मागणी करत होते. अखेर बलात्कार आणि हत्येच्या 26 दिवसांनी पश्चिम बंगाल सरकारने घोष याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

सीबीआयने एफआयआर दाखल केला याप्रकरणी सीबीआयने नुकतीच एफआयआर नोंदवली होती. घोष आणि इतरांविरुद्ध कलम 120बी (गुन्हेगारी कट), आयपीसी कलम 420 (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणांतील शिक्षेबाबत बोलायचे झाल्यास, 120B मध्ये कमाल 2 वर्षे ते जन्मठेप, 420 मध्ये कमाल 7 वर्षे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 6 महिने ते 5 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. घोष याच्याशिवाय या प्रकरणात सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिप्लव सिंघा, सुमन हजारा, अफसर अली याचा समावेश आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीMamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभाग