भरधाव कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:00+5:302015-02-18T23:54:00+5:30
भरधाव कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
भ धाव कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यूनागपूर : भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३५ वाजता आयशर गाडी क्रमांक एम. एच. ४०, वाय-११०३ चा चालक अरुण रामकृष्ण बोटरे (४६) रा. खापा पोस्ट सोनुली ता. काटोल याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागलवाडी रोड, वडधामणा ताजने सभागृहासमोर मोटारसायकल क्रमांक एम. एफ. व्ही. ४५५६ चा चालक दिनेश रमेश भेंडे (१८) रा. वडधामणा जुनी वस्ती याला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर स्वार दिनेश जागीच ठार झाला. रंगलाल मारोतराव पाल (५२) रा. वडधामणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.