शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भूपेंद्र यादव भाजपचे निवडणूक प्रभारी; महाराष्ट्रासाठी नियुक्ती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:39 IST

जावडेकर दिल्लीत, तोमर हरियाणात, माथुरांकडे झारखंड

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू करून या चार राज्यांसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दिल्लीचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपविली आहे. लोकसभा आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी पाहूनच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि नित्यानंद राय यांना सह-निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.श्याम जाजू हे प्रदेश भाजपचे संघटन प्रभारी आणि तरुण चूघ राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळतील.शेतकरीबहुल हरियाणात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे निवडणूक प्रभारी असतील, तर उत्तर प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह हे सह-निवडणूक प्रभारी असतील.झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम प्रकाश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचे प्रभारी होते.मौर्य सहप्रभारीउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकातील लक्ष्मण सेवादी यांना महाराष्टÑाचे सह-निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भूपेंद्र यादव हे गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. त्यांना महाराष्टÑातील राजकारणही चांगल्या प्रकारे माहिती आहे.बिहारसह अनेक राज्यांत निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीत भूपेंद्र यादव यांची महत्त्वाची भूमिका होती. महाराष्टÑातील उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर सह-निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली असावी, असे मानले जाते.

टॅग्स :BJPभाजपा