शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: रचल्या विटा, खड्डा खोदून केलं भूमिपूजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 20:06 IST

स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं. इतकंच नाही तर त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलंवाराणसी दौ-यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होताशौचालयांना ‘लज्जा रक्षणाचं घरं’ असं नाव दिलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

वाराणसी - स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं. इतकंच नाही तर त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं. वाराणसी दौ-यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी स्वत: शौचालयासाठी विटा रचल्या. पशुधन आणि आरोग्य मेळाव्याचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहंशाहपूरमध्ये आले होते. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  

यावेळी नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले. पशुधन आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, 'शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली आहे तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील'. शौचालयांना ‘लज्जा रक्षणाचं घरं’ असं नाव दिलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसंदर्भात बोलताना म्हटले की, अस्वच्छता आजार वाढवण्याचं काम करते. आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे. स्वच्छता राखणं संपूर्ण देशाची जबाबादारी आहे. सफाईसाठी जेवढं काम होणं अपेक्षित होतं तेवढं झालेले नाही. घाण आपण करायची आणि साफसफाई कुणी दुस-या व्यक्तीनं करायची, ही मानसिकता चालणार नाही. 

व्होट बँकसाठी कामं नाही करत विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी असे म्हणाले की,  भाजपासाठी व्होटबँकेच्या राजकारणापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. आतापर्यंत पशूधनासाठी काम करण्यात आलेले नव्हते. पशुपालन आणि दूध उत्पादनामुळे नवीन आर्थिक क्रांतीचा जन्म होईल. देशात आजही अनेकांकडे हक्काचे घर नाही. अशा लोकांना 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

जनतेच्या पैशांचा वापर जनतेसाठीच होणार  जनतेच्या पैशांचा वापर जनतेच्या भल्यासाठीच होणार. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात आम्ही काम करत आहोत आणि या कामात चांगल्या गतीनं पुढे जात आहोत. आम्ही प्रामाणिकपणे हे अभियान चालवलं आहे आणि जीएसटीदेखील या अभियानाचा एक भाग आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा