भुवनेश्वरमध्ये रूग्णालयात भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: October 17, 2016 23:19 IST2016-10-17T23:11:49+5:302016-10-17T23:19:11+5:30
इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅंड एसयूएम रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज संध्याकाळी अचानक भीषण आग
भुवनेश्वरमध्ये रूग्णालयात भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 17 - इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅंड एसयूएम रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज संध्याकाळी अचानक भीषण आग लागली. यामध्ये जवळपास 22 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.
आग लागल्याचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं समजत आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.