शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:17 IST

Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त

ठळक मुद्देनीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्तया वृत्तानंतर विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता विरोध

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्याला बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. तसंच यासाठी कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. "बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर बनवल्या जाण्याचं वृत्त हे बनावट आहे. नीता अंबानी यांना विद्यापीठातून असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही," अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी एएनआयशी बोलताना दिली. बनारस हिंदू विद्यापीठात सामाजिक विद्यान विभागाकडून नीता अंबानी यांना विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांतून प्रकाशित झालं होतं. परंतु याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी खंडन केलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांची २०१४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नीता अंबनी यांनी २०१० मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. दरम्यान, एक यशस्वी उद्योजिका म्हणून बनारस हिंदू विद्यापीठानं त्यांना हा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात होतं.विद्यार्थ्यांकडून विरोधनीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केल्याचं वृत्त समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विरोध करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय विद्यार्थ्यांनी कुलगुरूंवर बीएचयू उद्योजकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचाही आरोप केला. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर कुलगुरूंच्या निर्देशांवरून सामाजिक विज्ञान विभागाचे प्रमुख कौशल किशोर मिश्र हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले होते. परंतु विद्यार्थी कुलगुरूंशीच चर्चा करण्यावर ठाम होते. कुलपतींनी यावर बाहेर येऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं पत्र विभाग प्रमुखांकडे सोपवलं होतं. 

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीRelianceरिलायन्सStudentविद्यार्थी