कर्मचार्यांना दिली जबाबदारीची समज बीएचआर : आवश्यकतेनुसार करणार कर्मचारी नियुक्ती
By Admin | Updated: November 10, 2015 20:19 IST2015-11-10T20:19:59+5:302015-11-10T20:19:59+5:30
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्यांची सलग दुसर्या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आणि कामाचा आवाका पाहून आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कर्मचार्यांना दिली जबाबदारीची समज बीएचआर : आवश्यकतेनुसार करणार कर्मचारी नियुक्ती
ज गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्यांची सलग दुसर्या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आणि कामाचा आवाका पाहून आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.कर्मचार्यांची घेतली पुन्हा बैठकबीएचआर पतसंस्थेच्या प्रत्यक्ष कामाला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असली तरी कंडारे यांनी शाखा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कर्ज वसुली अधिकारी, प्रशासन अधिकारी यांची मंगळवारी पुन्हा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांकडे कोणकोणती जबाबदारी होती त्याबाबत प्रत्येकांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. तसेच प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी पतसंस्थेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सीआयडीकडील कागदपत्रे घेणारबीएचआर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात रामानंद नगर, जिल्हापेठ, धरणगाव, चोपडा व जामनेर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ांशी संबंधित रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केले आहे. त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांनी पदभार स्विकारल्यानंतर या कागदपत्रांच्या मागणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या कागदपत्रांशिवाय कर्जवसुलीला वेग देता येणार नसल्याने त्यांनी हालचाल सुरू केली आहे. कर्मचार्यांची भरती करणारबीएचआर पतसंस्थेच्या २५० पेक्षा जास्त शाखा राज्यभरात आहेत. संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेवीच्या मागणीसाठी ठेवीदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे अनेक कर्मचारी हे नोकरीचा राजीनामा देऊन सोडून गेले आहेत. काही महिन्यांपासून मोजक्या कर्मचार्यांवर पतसंस्थेचे काम सुरू होते. त्यामुळे काही शाखा बंद करण्यात आल्या. सध्या आहे त्या कर्मचार्यांमध्ये काम करण्यावर भर राहणार आहे. मात्र सुरळीत कामकाज करण्यासाठी आवश्यकता वाटेल त्यावेळी कर्मचार्यांची भरती करण्यात येईल अशी माहिती कंडारे यांनी दिली. ठेवीदारांची गर्दी सुरुचबीएचआर पतसंस्थेवर अवसायक बसल्यानंतर ठेवीदारांचा ओघ सुरुच आहे. आपल्या ठेवीची रक्कम मिळावी यासाठी वयोवृद्ध नागरिक तसेच ठेवीदार रोज मुख्य कार्यालयात चकरा मारत आहेत. मंगळवारी पुन्हा काही ठेवीदारांनी कंडारे यांची भेट घेत ठेवीची रक्कम परत करण्याची विनंती केली.