शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या सभेत तुफान राडा! तिकिटावरून कार्यकर्ते आपापसात भिडले; लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:26 IST

Congress Video : तिकीटावरून कार्यकर्ते भिडले आणि अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेश महापालिका निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भोपाळ महापालिकेत नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या निवडीवरून बोलावलेल्या काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला आहे. नगरसेवक तिकिटावरून कार्यकर्ते भिडले आणि अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने नरेला विधानसभेतील प्रभाग क्रमांक 75, 76, 77, 78, 79 आणि 36, 37, 38, 39, 40 यासह 59, 70, 71, 59, 58, 44, 43 या प्रभागांची बैठक बोलावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत नरेला विधानसभेशी संबंधित पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत प्रभागनिहाय दावेदारांनाही बोलावण्यात आले होते, मात्र वॉर्डाच्या दाव्यावरून काँग्रेसच्या दोन गटात वाद झाला. 

माजी नगरसेवक मोहम्मद सगीर यांनी ज्या वॉर्डातून दावा दाखल केला त्या प्रभागात ते बाहेरचा माणूस असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काँग्रेस नेते महेंद्रसिंग चौहान यांच्या समर्थकांनी विरोध केला. यावरून मोहम्मद सगीरचे समर्थक आणि महेंद्रसिंग चौहान यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. 

सभेत ठेवलेले टेबलही फेकून देण्यात आले. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरही कार्यकर्त्यांनी एकमत न झाल्याने आपला राग एकमेकांवर काढला, त्यानंतर बैठक रद्द करण्यात आली. काँग्रेस पक्ष उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रभागनिहाय बैठक बोलावत आहे. मात्र नरेला विधानसभेत नगरसेवकपदाच्या उमेदवाराबाबतचा गोंधळ काँग्रेससाठी अडचणीचा ठरला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश