मंदिरासाठी मुस्लिमांचे भूदान

By Admin | Updated: May 22, 2015 02:09 IST2015-05-22T02:09:48+5:302015-05-22T02:09:48+5:30

भारतातच विराट रामायण मंदिरासाठी भूदान करून काही मुस्लिम कुटुंबांनी सद््भावनेचा अनोखा वस्तुपाठ घालून दिला आहे.

Bhoodan of Muslims for the temple | मंदिरासाठी मुस्लिमांचे भूदान

मंदिरासाठी मुस्लिमांचे भूदान

पाटणा : अयोध्येतील राम जन्मभूमीसाठी सौगंध खात झालेला टोकाचा संघर्ष अनुभवणाऱ्या भारतातच विराट रामायण मंदिरासाठी भूदान करून काही मुस्लिम कुटुंबांनी सद््भावनेचा अनोखा वस्तुपाठ घालून दिला आहे. धार्मिक सद्भाव वृद्धिंगत करणारी ही घटना बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात झाली. जगातील सर्वात मोठ्या नियोजित हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान देणाऱ्या मुस्लिम बांधवांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
महावीर मंदिर ट्रस्टच्या वतीने पूर्व चंपारण जिल्ह्यातील जानकीनगर येथे जगातील सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती केली जाणार आहे. मंदिरासाठी नियोजित जागेच्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंबांच्या जमिनी असल्याने समस्या निर्माण झाली होती. परंतु बहुतांश मुस्लिम कुटुंबांनी औदार्य दाखवीत आपआपल्या जमिनी मंदिरासाठी दान देण्याचे जाहीर केले. तर बाकीच्यांनी अत्यल्प भावात जमिनी दिल्या. त्यामुळे मंदिराचा मार्ग मोकळा झाला. (वृत्तसंस्था)

२०० एकर जागेत मंदिर
पाटण्यापासून सुमारे १५० किमी अंतरावर पूर्व चंपारण जिल्ह्यातील जानकीनगर येथे २०० एकर जागेत हे मंदिर उभारले जात असून यासाठी ५०० कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील एका कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे उभारल्या जाणाऱ्या भूकंपरोधी या मंदिराची लांबी २,५०० फूट आहे. ३७९ फूट उंच असलेल्या या मंदिराची रुंदी १,२९६ फूट आहे.

Web Title: Bhoodan of Muslims for the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.