मोदींवर टीका भोवली, अकबरुद्दीन ओवेसींविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 5, 2015 18:54 IST2015-10-05T18:54:08+5:302015-10-05T18:54:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना महागात पडले आहे.

Bhola, criticized Modi, filed an FIR against Akbaruddin Owaisi | मोदींवर टीका भोवली, अकबरुद्दीन ओवेसींविरोधात गुन्हा दाखल

मोदींवर टीका भोवली, अकबरुद्दीन ओवेसींविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाइन लोकमत

किशनगंज, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना महागात पडले आहे. बिहारमधील किशनगंज पोलिस ठाण्यात अकबरुद्दीन ओवेसींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमधील किशनगंज येथे रविवारी अकबरुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतली होती. या सभेत अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुजरात दंगलीवरुन टीका करताना मोदींचा उल्लेख शैतान आणि क्रूर असा केला होता. गुजरात दंगलींसाठी मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विधानाचे त्यांचे बंधू व एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील समर्थन केले होते. तर भाजपाकडून या विधानाचा निषेध दर्शवण्यात आला होता. सोमवारी किशनगंजच्या गटविकास अधिका-याने अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: Bhola, criticized Modi, filed an FIR against Akbaruddin Owaisi