विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो
By Admin | Updated: January 12, 2017 21:34 IST2017-01-12T21:34:19+5:302017-01-12T21:34:19+5:30
बिहारमध्ये परिक्षांमध्ये घोटाळे होणं काही नवं नाही मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर चक्क भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो लावल्याची घटना

विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि.12 - बिहारमध्ये परिक्षांमध्ये घोटाळे होणं काही नवं नाही मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर चक्क भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो लावल्याची घटना उघडकीस आली आहे. कोणतीही शहानिशा न करता हे ओळखपत्र विद्यार्थिनीला देण्यात आलं.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही विद्यार्थिनी राहते. स्वतःच्या ओळखपत्रावरील अश्लिल फोटो पाहून तीला चांगलाच धक्का बसला. 8 जानेवारी रोजी बिहार कर्मचारी निवड आयोगाकडून(BSSC) हे ओळखपत्र देण्यात आलं असून 26 फेब्रुवारीला आंतर-स्तरीय संयुक्त प्रवेश स्पर्धा परीक्षा होणार आहे. प्रभात खबरने याबाबत वृत्त दिलं आहे. सध्या हे ओळखपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे त्यामुळे संबंधित विद्यार्थिनीला मात्र त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
काही खोडकर प्रवृत्तीच्या व्यक्तिंकडून जाणून-बुजून असं कृत्य करण्यात आलं असून यामध्ये आमची काहीही चुकी नाही असं बीएसएससीकडून सांगण्यात आलं आहे. शिक्षण पद्धतीसाठी आधीच कुप्रसीद्धी मिळालेल्या राज्यावर हा अजून एक डाग आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा उघडकीस आला होता त्यावेळी बिहार परीक्षा मंडळाकडून जवळपास 68 महाविद्यालये व 19 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती तर काही जणांना अटकही झाली होती.