शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव हिंसाचार : तपासाची केस डायरी सुप्रीम कोर्टाने मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 04:37 IST

भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून देशाच्या विविध भागांतून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच प्रमुख मानवी हक्क कार्यकर्त्यांना सोडून द्यावे, यासाठीच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून देशाच्या विविध भागांतून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच प्रमुख मानवी हक्क कार्यकर्त्यांना सोडून द्यावे, यासाठीच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.या पाचजणांविरुद्ध अटक करण्याएवढा सबळ पुरावा आहे का, याची तपासणी करण्याच्या अनुषंगाने सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे गेले दोन दिवस सविस्तर युक्तिवाद झाले. त्यानंतर निकाल राखून ठेवला गेला. तोपर्यंत पाचहीजण त्यांच्या घरात नजरकैदेत राहतील, असे न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी व आनंद ग्रोव्हर या ज्येष्ठ वकिलांनी या आरोपींवरील आरोप हे निव्वळ कुभांड आहे, हे सूत्र पकडून युक्तिवाद केला. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यात कसा दम नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व मूळ फिर्यादी तुषार दामगुडे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी युक्तिवाद केला व या आरोपींचा एका व्यापक गंभीर कटाशी संबंध असल्याचा ठाम दावा केला.या पाच जणांचा ताबा देऊन पोलिसांना तपास करू द्या व अटकेची योग्यायोग्यता खालच्या न्यायालयांना ठरवू द्या, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते.>दोघे न्यायाधीश मराठीमुळात भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारापासून सुरु झालेला हा तपास सरकार उलथून टाकण्याच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कथित कटापर्यंत कसा पोहोचला, हे तपासाच्या कागदांवरून कुठेच दिसत नाही. त्यामुळे हे सर्व कुभांड असल्याचा बळकटी मिळते, यावर याचिकाकर्त्यांचा भर होता. त्या अनुषंगाने सुनावणी संपल्यावर न्यायालयाने या तपासाची संपूर्ण केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. हे सर्व कागद मराठीत असतील, असा मुद्दा निघाला; परंतु खंडपीठावरील दोन न्यायाधीश मराठी असल्याने याची अडचण येणार नाही, असे ठरले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय