शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

भवानीपूर: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलीप घोष यांच्यावर हल्ला; सुरक्षा रक्षकांनी काढले पिस्तूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:28 IST

West Bengal by election: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली.

पश्चिम बंगालच्या  (west bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जर मुख्यमंत्री पद टिकवायचे असेल तर भवानीपूरहून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखलेल्या ममतांना पुन्हा हरवण्यासाठी भाजपाने मोठी ताकद भवानीपूर मतदारसंघात झोकली होती. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पिस्तूल काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Bhabanipur bypoll: Ruckus during BJP campaign, Dilip Ghosh’s security men pull out guns)

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. भाजपा खासदारासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीएमसी एवढी घाबरलीय कशाला? नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा राग टीएमसी इथे काढत आहे. 

दिलीप घोष यांनी म्हटले की, लढाई मोठी आहे. टीएमसी घाबरलीय. यामुळे ते आता मारहाणीवर आले आहेत. भाजपा खासदार अर्जुन सिंह प्रचार करत होते. तेव्हा टीएमसीचे काही लोक त्यांच्या मागे लागले. गो बॅकचे नारे देत होते. त्यांना धक्काबुक्की करून त्या भागातून जाण्यास भाग पाडले. 

नंदीग्राम मतदार संघात झाला होता ममतांचा पराभव - याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढली होती. यासाठी त्यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला होता. मात्र, नंदीग्राममध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी सुवेंदू अधिकारी टीएमसीमध्येच होते.

ममता बॅनर्जींना 5 नोव्हेंबरपर्यंत जिंकून विधानसभेत पोहोचणे आवश्यक -दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी