शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय मजदूर संघ करणार देशव्यापी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 21:16 IST

आधी चेतावनी सप्ताह व नंतर देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कामगार कायदा दुरूस्ती: दोन टप्प्यात करणार निषेध

पुणे: कामगार कायद्यातील दुरूस्त्यांच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. आधी चेतावनी सप्ताह व नंतर देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतील या संघटनेचा हा विरोध त्याच विचारसरणीला मानणार्या केंद्र सरकारला आव्हान देणारा ठरण्याची चिन्हे आहेत. भामसंच्या नुकत्याच झालेल्या १९ व्या अखिल भारतीय अधिवेशनात केंद्र सरकारला या मुद्द्यांवर जाहीर विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. आभासी पद्धतीने झालेल्या या अधिवेशनात संघटनेचे देशभरातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या दुरूस्तीबाबत भामसंने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीची दखल न घेता केंद्र सरकारने सर्व दुरूस्त्या लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्या.त्यामुळेच भामसंने आता विरोध अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूरला केंद्र सरकारच्या निषेधार्थ जाहीर निदर्शनेही करण्यात आली होती. मात्र आता अधिवनात हा विरोध संघटितपणे करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान देशभर चेतावणी सप्ताह पाळण्यात येईल. त्यानंतर २८ ऑक्टोबर ला देशभर निषेध दिन पाळण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे आता वरिष्ठ पदाधिकार्यांकडून नियोजन करण्यात येत आहे.  ---//

भामसं ही कामगारांसाठी काम करणारी देशव्यापी संघटना आहे. कामगार कायद्यातील दुरूस्तीला असलेला विरोध आम्ही लपवलेला नाही. त्यामुळेच आता जाहीरपणे देशव्यापी आंदोलन करण्याचे अधिवेशनातच ठरले आहे. रविंद्र देशपांडे, राज्य सरचिटणीस, भारतीय मजदूर संघ

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकार