शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली; लसीकरण, कोरोनाशी लढ्याला प्राधान्य देणार - भारती पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:32 IST

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे.

नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्रिपदाची सूत्रे गुरुवारी डॉ. भारती पवार यांनी स्वीकारली असून, देशापुढे असलेले कोरोनाचे संकट पाहता, आगामी काळात कोरोनाशी लढा व देशातील प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यासाठी ऐनवेळी बोलावणे आल्याने एकट्याच गेलेल्या डॉ. भारती पवार यांच्या भेटीसाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य दिल्लीला रवाना झाले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. यानिमित्ताने का होईना, वैद्यकीय सेवेला हातभार लागण्याची संधी आरोग्य राज्यमंत्रिपदामुळे मिळाल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले. देशात लसीकरणाने वेग धरला असून, डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असेही त्या म्हणाल्या. 

पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली मंत्रिपदाचा कोणताही अनुभव पाठीशी नसतानाही पक्षाने व पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली असून, देशापुढील कोरोनाचे संकट गेल्या वर्षभरापासून कायम आहे. आगामी काळात कोरोनाशी लढा व देशातील प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. - भारती पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री 

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCorona vaccineकोरोनाची लस