शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो'; CM योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 14:21 IST

तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

'पंतप्रधानांचे आभार'

कृषी कायद्यांवर बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत,' असेही ते म्हणाले.

...तोपर्यंत आंदोलन परत घेणार नाहीपीएम मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले होते. या सगळ्यात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश तिकट यांनी शेतकरी आंदोलन तातडीने मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत दिले आहेत. तिकैट म्हणाले की, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत. याशिवाय, सरकारने एमएसपीसोबतच शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा करावी, असेही तिकैट म्हणाले आहेत. 

विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला

सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, 'देशाच्या अन्नदात्याने गर्विष्ठांची मान झुकवली. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंदचा शेतकरी!'. त्याचवेळी, काँग्रेसने ट्विट करून 'अभिमान तुटला, माझ्या देशाचा शेतकरी जिंकला' असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी