शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

Airtel Success Story : Hero सायकलच्या मालकाकडून घेतली ५ हजारांची उधारी; आज टेलिकॉम क्षेत्रात Airtel ठरली लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:51 IST

Airtel Success Story : पाहा कसा होता पुश बटन असलेल्या फोनच्या इम्पोर्टपासून एअरटेल पर्यंतचा मित्तल यांचा प्रवास.

Airtel Success Story : देशातील कोट्यवधी युझर्स आजच्या घडीला एअरटेलचं (Airtel) सिमकार्ड वापरत असतील. एअरटेलला देशात आणि परदेशात उभं करण्याचा सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांचा आजवरचा प्रवास हा थक्क करणारा आहे. "ज्यावेळी चेकचा सर्वाधिक वापर केला जात होता ही तेव्हाची गोष्ट आहे. मी एकदा हिरो सायकलचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याकडे गेलो आणि ५ हजार रूपयांचा चेक लिहिण्यास सांगितलं. त्यांनीही लगेच त्याला होकार दिला. परंतु मी त्या ठिकाणाहून निघताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या हृदयात घर करून गेली. त्यांनी मला सांगितलं की याची कधीही सवय करून घेऊ नकोस." एकदा सुनिल मित्तल यांनी आपल्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण काढत हा किस्सा सांगितला होता. ५ हजार रूपयांची उधारी घेणारे तेच सुनिल मित्तल आज ४.३६ लाख कोटी रूपयांच्या एअरटेल या कंपनीचे मालक आहेत. ३५ कोटी युझर्ससह एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी ठरलीये.

सुनिल मित्तल यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे २३ ऑक्टोबर १९५७ ला झाला. त्यांचं वडील सतपाल मित्तल हे एक राजकारणी होते आणि दोन वेळा ते खासदार म्हणूनही निवडून गेले होते. मित्तल यांनी सुरुवातीचं शिक्षण मसूरी येथील विनबर्ग स्कूलमधून केलं. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ग्वाल्हेरमधील सिंधिया स्कूलमधून केलं. १९७६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली. आपल्याला शाळेपेक्षा रस्त्यावरून अधिक शिकता आलं असं मित्तल म्हणतात. लुधियानामधील परिस्थिती अशी होती की त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

अनेक गोष्टींचा घेतला अनुभवपदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मित्तल यांनी आपल्या वडिलांकडून २० हजार रूपये घेतले आणि सायकल पार्ट्सचं काम सुरू केलं. परंतु या कामालाही मर्यादा आहेत, असं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर १९८० मध्ये व्यवसायाची संधी शोधण्यासाठी त्यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली भावंडं राकेश आणि राजन यांच्यासोबत मिळून भारती ओव्हरसीज ट्रेडिंगची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेल्या सायकलच्या व्यवसायाची विक्री करून इंपोर्ट लायसन्सही मिळवला.सुनिल मित्तल यांनी सर्वप्रथम सुझुकीची डिलरशीप मिळवली आणि भारतात त्यांच्या इलेक्ट्रीक पॉवर्ड जनरेटर्सची विक्री सुरू केली. यामध्ये त्यांना मोठा नफाही मिलाला आणि व्यवसायही चांगला सुरू झाला. या व्यवसायात पूर्णपणे हात बसत होता, तोवर १९८३ मध्ये सरकारनं जनरेटरच्या निर्यातीवर बंदी घातली आणि एका फटक्यात त्यांचा व्यवसाय ठप्प झाला.

पुश बटन फोनपासून टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्रीजे यापूर्वी कोणीही केलं नाही तर करायचं हा सुनिल मित्तल यांचा थंब रुल आहे. यामुळेच त्यांनी १९८६ मध्ये पुश बटन फोन इम्पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. ते तैवानमधून पुश बटन फोन इम्पोर्ट करू लागले आणि भारतात त्याला बीटेल या ब्रान्डच्या नावाखाली विकू लागले. यामध्येही त्यांना मोठा नफा झाला. १९९० च्या दशकापर्यंत त्यांनी फोन व्यतिरिक्त फॅक्स मशीन आणि अन्य दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनाला सुरूवात केली. 

१९९२ मघ्ये सरकारनं पहिल्यांदा मोबाईल सेवांसाठी लायसन्स वाटप सुरू केलं. त्यांनी ही संधी असल्याचं पाहत फ्रेन्च कंपनी विवेंडीसोबत दिल्ली आणि आसपासच्या भागासाठी सेल्युलर लायसन्स मिळवला. १००५ मध्ये सुनिल मित्तल यांनी सेल्युलर सेवांसाठी भारती सेल्युलर लिमिटेडची स्थापना केली आणि  एअरटेल या ब्रँड अंतर्गत काम सुरू केलं. पाहता पाहता एअरटेलचे २० हजार, २० लाख आणि नंतर २० कोटी ग्राहक झाले.

आक्रमक स्ट्रॅटजी१९९९ मध्ये भारती एन्टरप्राईजेसनं कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सेल्युलर ऑपरेशन्स वाढवण्यासाठी जेटी होल्डींग्सचं अधिग्रहण केलं. त्यानंतर २००० साली भारतीनं चेन्नईत स्कायसेल कम्युनिकेशन्सचंही अधिग्रहण केलं. यानंतर २००१ मध्ये कंपनीनं स्पाईस सेल कोलकाताचं अधिग्रहण केलं. यानंतर कंपनी बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्ट करण्यात आली.  २००८ मध्ये एअरटेलचे भारतात ६ कोटी ग्राहक होते. त्यावेळी एअरटेलचं व्हॅल्यूएशन ४० बिलियन डॉलर्स होतं. यामुळे भारती एअरटेल जगातील टॉपची कंपनी बनली.

जिओ लाँच झाल्यावर धक्का२०१६ मध्ये रिलायन्स जिओ लाँच झाल्यानंतर एअरटेलला मोठा झटका बसला. जिओच्या लाँचवेळी भारतात ८ दूरसंचार कंपन्या होत्या. आता त्यापैकी केवळ चारच शिल्लक आहेत. त्यावेळी एव्हरेज कॉलिंग रेट हा ५८ पैसे प्रति मिनिट होता, तो २०१८ मध्ये कमी होऊन १८ पैसे आणि आता त्यापेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एअरटेललाही आपले दर मार्केटनुसार खाली आणावे लागले.

"आम्हाला नफ्यात येण्यासाठी जवळपास ३०० रूपये आरपूवर यावं लागेल. आता आम्ही टॅरिफ वाढवून १६२ रूपयांच्या आरपूवर आलो आहोत. पाण्यातून डोकं वर काढण्यासाठी आम्हाला २०० रूपये आरपूवर जावं लागेल," असं मत एअरटेल इंडिया आणि साऊथ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी व्यक्त केलं.तर दुसरीकडे एअरटेलची परिस्थिती थोडी बिकट होण्यामागे त्यांनी ग्राहकांना हलक्यात घेतल्याचं मत एका ज्येष्ठ पत्रकारानं व्यक्त केलं. ज्यावेळी जिओ ४जी सेवा आणण्याचे प्रयत्न करत होता, तेव्हा एअरटेलनं काहीच केलं नाही.

एअरटेल भारतात २५ वर्षांपासून लीडर होती. ते आपली २जी आणि ३जी सेवा सुधारण्याचंच काम करत होते. एअरटेलनं खुप उशिरा ४ जी सेवांवर काम सुरू केलं. परंतु सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. एअरटेल न केवल आता आपला कस्टमर बेस वाढवत आहे, त्यांनी प्रीपेड प्लॅन्समध्ये २५ टक्क्यांची वाढ करून नफ्यात येण्याचेही प्रयत्न सुरू केले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sunil Mittalसुनिल मित्तलAirtelएअरटेलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी