शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:57 IST

भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलू- भाजपा नेता

अमरावती: तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास भारत माता की जय आणि वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून देऊ, असं विधान भाजपाचे नेते राजा सिंह यांनी केलं. सिंह यांनी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही जहरी टीका केली आहे. भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, असंदेखील ते म्हणाले. त्यांच्या या विधानानं वाद होण्याची शक्यता आहे. भाजपा नेते राजा सिंह अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरुन असदुद्दीन ओवैसी यांना लक्ष्य केलं आहे. 'राज्यात भाजपाची सत्ता आल्यास, भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून देऊ,' असं सिह यांनी म्हटलं. 'भारत माता की जय म्हणणार नाही, असं ओवैसी अनेकदा जाहीर सभांमध्ये म्हणतात. तुम्ही भारतात भारत माता की जय म्हणणार नाही. मग काय पाकिस्तानात जाऊन भारत माता की जय म्हणणार का?, असा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो. जर तुम्हाला भारत माता की जय म्हणायचं नसेल, तुमचं भारतावर प्रेम करत नसेल, तर अशा गद्दारांनी पाकिस्तानात जावं आणि तिथून निवडणूक लढवावी,' असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं. भाजपाची सत्ता आल्यावर भारत माता की जय आणि वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येईल, असं राजा सिंह म्हणाले. 'जर त्या गद्दारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना परिणाम भोगावे लागतील,' असा इशारादेखील त्यांनी दिला. सिंह यांनी याआधीही अशी विधानं केली आहेत. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास, हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्यात येईल, असं सिंह यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन