शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 16:43 IST

Rahul Gandhi Security Breach: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने दुसऱ्यांना गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Bharat Jodo Yatra Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन नवीन राजकारण सुरू झाले आहे. यातच सीआरपीएफच्या दाव्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसने शनिवारी (31 डिसेंबर) पुन्हा भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले आहे. यापूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने म्हटले होते की राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी मार्गदर्शक तत्त्वांचे "उल्लंघन" केले होते.

काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सीआरपीएफकडून मिळालेल्या प्रतिसादाविरोधात आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. हे अस्वीकार्य आहे, कारण यामुळे समस्या सुटत नाही तर ती मोठी होते. पहिल्या पत्रात काँग्रेसने यात्रेच्या दिल्ली टप्प्यात सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सीआरपीएफने त्यावर प्रत्युत्तरही दिले. 

काय म्हणाले सीआरपीएफ?सीआरपीएफ राहुल गांधींना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवते. सुरक्षा एजन्सीने काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते की, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार केल्या गेल्या आहेत. यात्रे दरम्यान राहुल गांधींनी 113 वेळा नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती सीआरपीएफने दिली. 

काँग्रेसने पुन्हा पत्र लिहिलेसीआरपीएफच्या दाव्यानंतर आपल्या ताज्या पत्रात, काँग्रेसने पुन्हा एकदा सोहना, हरियाणातील घरफोडीचा मुद्दा उपस्थित केला आणि सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांमधील समन्वयाच्या अभावावरही भर दिला. मात्र, यापूर्वी शहर पोलिसांशी चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणेने दिले होते.

"अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले"

काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या नवीन पत्रात असे लिहिले आहे की, "अनेकदा अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले होते. त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफिक पुरावे शेअर केले जाऊ शकतात." हरियाणा पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या कर्मचार्‍यांनी यात्रेत घुसखोरी केल्याचे पक्षाने म्हटले आहे.  भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, या विश्वासाने भारत जोडो यात्रेत आम्ही पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह