शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भारत जोडो यात्रेत 'न्याय' शब्द जोडला; जयराम रमेश यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:39 IST

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल यांच्या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 2.0 ही 14 जानेवारी रोजी मणिपूरपासून सुरू होईल. अनेक महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूर आता सामान्य स्थितीची वाट पाहत आहे. राहुल यांच्या या 66 दिवसांच्या 6,700 किलोमीटरच्या यात्रेला 'भारत जोडो न्याय यात्रा' असं म्हटलं जात आहे. यापूर्वी या यात्रेला 'भारत न्याय यात्रा' असं नाव देण्यात आलं होतं. या यात्रेत 15 राज्ये आणि 100 हून अधिक लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. 

महात्मा गांधींचं जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील पोरबंदरमध्ये ही यात्रा संपणार आहे. ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून सुरू करण्याचा काँग्रेसचा विचार होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या वर्षीच्या 'भारत जोडो यात्रे'मुळे निर्माण झालेला प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी "जोडो" हा शब्द यामध्ये जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे."

"राहुल गांधींच्या दौऱ्याचा विचार न्याय असा आहे. भारतातील लोकांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणं हा त्या मागचा उद्देश आहे." कन्याकुमारी ते श्रीनगर या भारत जोडो यात्रेने खूप चांगल्या भावना निर्माण केल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. या भेटीमुळे राहुल गांधींकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलल्याचं काँग्रेस नेत्यांनी मान्य केलं आहे. 

भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता इम्फाळ येथून सुरू होईल. मध्य भारतात पोहोचण्यापूर्वी ती मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालयमधून पुढे बंगालमध्ये जाईल. गेल्यावेळेप्रमाणे हा प्रवास पूर्णपणे पायी नसणार आहे. प्रवासाच्या काही भागांसाठी काँग्रेस बसचा वापर करेल असं जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं.

जयराम रमेश म्हणाले की, "आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, त्यांचे समर्थक, सामान्य जनता आणि स्वयंसेवी संस्थांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत." अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला निमंत्रित करणार का? असं विचारलं असता रमेश म्हणाले की, इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीचा भाग आहेत." 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी