शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पुस्तकांत ‘इंडिया’ऐवजी भारत; NCERT पुस्तकांसाठी शिफारस, नव्या वादाला उकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:20 IST

एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :भारत हे शतकानुशतके जुने नाव आहे. भारत हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील ‘इंडिया’ नाव बदलून भारत करण्याची शिफारस बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली. एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत इंडियाऐवजी भारत नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंडियाऐवजी भारत नावाचा अवलंब केला होता.

अभ्यासक्रमात काय असेल? 

सर्व अभ्यासक्रमांमध्ये ‘प्राचीन इतिहासा’ऐवजी ‘शास्त्रीय इतिहासा’चा तसेच भारतीय ज्ञानप्रणालीच्या समावेशाचीही शिफारस करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी भारत नाव ठेवण्याची शिफारस काही महिन्यांपूर्वीच केली होती, अशी माहिती समितीचे प्रमुख इसाक यांनी दिली.

विरोधकांची टीका; सरकार घाबरले 

केंद्र सरकारला आव्हान देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी नावारूपाला आल्यापासून सरकार घाबरले आहेत. भारत आणि इंडिया ही नावे संविधानसंमत असतानाही इंडियाला हटविण्याच्या प्रयत्नांतून ‘इंडिया’ आघाडीविषयीची त्यांची भीती स्पष्टपणे जाणवत असल्याचा टोला आपने लगावला.

शिफारस देणाऱ्या समितीत कोण?  

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या  समाजशास्त्रावरील समितीत आईसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे, शिक्षिका ममता यादव यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया घाईची ठरेल : एनसीइआरटी

एनसीईआरटीचा नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या बैठकीही होऊ घातल्या आहेत. सध्या या शिफारशीवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत यावर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे एनसीईआरटी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Indiaभारत