महाडमध्ये भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 23:14 IST2014-09-26T23:14:55+5:302014-09-26T23:14:55+5:30
: महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी शिवसैनिकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

महाडमध्ये भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाड : महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी शिवसैनिकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
यावेळी शहरातून शिवसैनिकांनी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आ. गोगावले यांच्यासह माजी मंत्री प्रभाकर मोरे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उपजिल्हाप्रमुख बिपीन म्हामूणकर, तालुकाप्रमुख
सुरेश महाडिक, पं.स. सभापती दिप्ती पळसकर, तसेच महाड-मागण-पोलादपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आ. गोगावले यांनी उमेदवारी अर्ज दाखल के ला. यावेळी चंद्रकांत कळंबे, विकास गोगावले, बिपीन म्हामूणकर आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. (वार्ताहर)