शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रूपयांची रोखड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
4
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
5
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
6
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
7
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
8
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
9
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
10
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
11
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
12
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
13
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
14
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
15
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
16
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
18
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
19
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
20
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:16 IST

काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.

नवी दिल्ली - देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे काम सुरू आहे. अशातच लशीसंदर्भात वेगवेगळे दावे समोर येत आहेत. यातच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनसंदर्भात काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी, कोव्हॅक्सीन तयार करण्यात गाईच्या वासराचे सीरम वापरले जाते, असा दावा केला आहे. हा दावा त्यांनी एका RTI मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे केला आहे. यावरूनच आता लशीसंदर्भात वाद सरू झाला आहे आणि खुद्द भारत बायोटेकलाच यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. (Bharat biotech reactions on Covaxin newborn calf serum theory congress gaurav pandhi details)

ट्विटमध्ये करण्यात आलाय असा दावा - काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.

कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वारसांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI

गौरव यांनी ट्विट केले आहे, एका RTI च्या उत्तरात मोदी सरकारने मान्य केले आहे, की कोव्हॅक्सीनमध्ये गाईच्या वासराचे सीरम वापरले जाते. यात 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या वासरांना मारून त्याचा वाप केला जातो. हा मोठा गुन्हा आहे. ही माहिती यापूर्वीच सर्वांच्या समोर यायला हवी होती. गौरव पांधी यांनी या मुद्द्यावर आणखीही काही ट्विट केरत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

 भारत बायोटेकनं दिली अशी प्रतिक्रिया - काँग्रेस नेते गौरव पांधी यांच्या या दाव्यानंतर, सोशल मिडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता भारत बायोटेकनेही आपले स्पष्टिकरण दिले आहे. भारत बायोटेकने म्हटले आहे, की व्हायरस लशींच्या निर्मितीत गाईच्या वासरांच्या सीरमचा वापर केला जातो. याचा वापर सेल्सच्या ग्रोथसाठी केला जातो. मात्र, SARS CoV2 व्हायरसची ग्रोथ अथवा फायनल फॉर्म्यूल्यात याचा वापर करण्यात आलेला नाही.

Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर...

भारत बायोटेकचे म्हणणे आहे, की कोव्हॅक्सीन ही पूर्णपणे शुद्ध लस आहे. सर्व प्रकारची अशुद्धी दूर करून ती तयार करण्यात आली आहे. जगभरात गेल्या अनेक दशकांपासून लशीच्या निर्मितीत वासरांच्या सीरमचा वापर केला जात आहे. साधारणपणे गेल्या नऊ महिन्यांपासून यासंदर्भात सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंcongressकाँग्रेसPoliticsराजकारण