शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh: 'अग्निपथ'विरोधात आज भारत बंद; दिल्ली बॉर्डरवर मोठा जाम, देशभरातील शेकडो ट्रेन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:33 IST

Bharat Bandh News: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.

Bharat Bandh Protest: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे. या योजनेविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरुन निषेध करत असून, अनेक राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. दरम्यान, या योजनेविरोधात देशभरातील अनेक संघटनांनी आज(20 जून) भारत बंदची घोषणा केली आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर राज्यांतील पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफनेही तयारी केली आहे. हरियाणामध्ये या आंदोलनाबाबत यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. अशा स्थितीत भारत बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फरिदाबाद पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की, गौतम बुद्ध नगरमध्ये कलम 144 आधीपासूनच लागू आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. ग्रेटर नोएडातील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी 200 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनीही भारत बंदची तयारी मजबूत केली आहे. केरळ पोलिसांनी सांगितले आहे की त्यांचे सर्व जवान 20 जून रोजी कर्तव्यावर असतील. यादरम्यान जर कोणी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करू. झारखंडमध्येही भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि काही संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनीही भारतासंदर्भात विशेष तयारी केली आहे. दिल्ली बॉर्डरवर मोठा ट्रॅफिक जामदेशभरात बंदचा परिणाम दिसून येत आहे. भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर मोठा जाम झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहारमध्येही तरुणाई बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. फोनवरुन चुकीची माहिती प्रसारित होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.अनेक रेल्वे रद्दअग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वेला बसला आहे. अनेक गाड्यांची जाळपोळ झाल्यानंतर आता आज 181 मेल एक्सप्रेस रद्द तर 348 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 4 मेल एक्सप्रेस आणि 6 पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वेagitationआंदोलन