भंडारी समाजाची रविवारी मडगावमध्ये आमसभा
By Admin | Updated: March 23, 2017 17:18 IST2017-03-23T17:18:39+5:302017-03-23T17:18:39+5:30

भंडारी समाजाची रविवारी मडगावमध्ये आमसभा
>पणजी : गोमंतक भंडारी समाजाची आमसभा येत्या रविवारी 26 रोजी बोलविण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता भंडारी भवन, पाजीफोंड- मडगाव येथे ही सभा होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल होबळे असतील, असे समाजाचे महासचिव उपेंद्र गावकर यांनी कळविले आहे. समाज बांधवांशीसंबंधित विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.(प्रतिनिधी)