भामा आसखेडचा प्रकल्प सल्लागारामुळे रखडला

By Admin | Updated: March 18, 2015 23:04 IST2015-03-18T23:04:27+5:302015-03-18T23:04:27+5:30

पुणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी भामा आसखेडच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी तीन वर्षापूर्वी नेमलेल्या सल्लागाराने व्यवस्थित काम न केल्याने हा प्रकल्प रखडून त्यावरच्या खर्चात वाढ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सल्लागाराकडील काम काढून घेऊन त्याठिकाणी नवीन सल्लागारांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

Bhama Aschhed's project is stuck due to consultation | भामा आसखेडचा प्रकल्प सल्लागारामुळे रखडला

भामा आसखेडचा प्रकल्प सल्लागारामुळे रखडला

णे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी भामा आसखेडच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी तीन वर्षापूर्वी नेमलेल्या सल्लागाराने व्यवस्थित काम न केल्याने हा प्रकल्प रखडून त्यावरच्या खर्चात वाढ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सल्लागाराकडील काम काढून घेऊन त्याठिकाणी नवीन सल्लागारांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.
तीन वर्षे चालढकल केल्याने प्रकल्पाचा खर्च वाढल्याने संबंधित सल्लागाराला नोटीस बजावण्यात आली, त्यानंतरही त्याच्या कामात सुधारणा न झाल्याने त्याच्याकडील काम काढून घेण्यात आले असल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली
भामा आसखेड या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी पाणी नियोजन, नकाशे आणि इतर तांत्रिक बाबींच्या पूतर्तेसाठी युनीटी कनस्लंटंट या फर्मला सल्लागार म्हणून नेमण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे या कामासाठी आवश्यक असलेले पुरेसे मनुष्यबळ नव्हते, त्यामुळे काहीच काम पुढे सरकले नाही. त्यामुळे ठरलेल्या करारनुसार त्यांना कोणतेही पैसे महापालिकेकडून दिले जाणार नाहीत असे अश्विनी कदम यांनी स्प्ष्ट केले.
खडकवासला आणि मुंढवा जॅकवेल पाणीपुरवठा योजनेतील काही अत्याधुनिक यंत्रणेची पाहाणी करण्यासाठी महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी चीन दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍याचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदाराकडून केला जाणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या सर्व वाहनांना जीपीएलस यंत्रणा बसविणे, स्वच्छता गृहे सफाईसाठी जेटींग मशिन्स खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील ५वी ते १०वीपर्यंतच विद्यार्थ्यांच्या बसपास योजनेचा ५ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्चासही मान्यता देण्यात आली.

Web Title: Bhama Aschhed's project is stuck due to consultation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.