शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले होते भय्यू महाराज? 20 मिनिटं विचार करून झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 3:28 PM

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.

इंदूर- मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेले अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे भक्त, कुटुंबीय सगळ्यांनीच आत्महत्येबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. नेहमी शांत असणारे भय्यू महाराज आत्महत्या का करतील? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चांनंतर भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. भय्यू महाराज अंधश्रद्धेच्या विळख्यात अकडले होते. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आत्महत्येपूर्वी काही दिवस भय्यू महाराज प्रचंड तणावात होते. त्यांच्या शरिरात थकवा होता. या थकव्याला त्यांनी एक विकार मानलं होतं. हा विकार दूर करण्यासाठी त्यांनी चित्तौडगड (राजस्थान)मधील जादुटोणा करणारा बाबा मोहम्मद उर्फ बाबा साहब नावाच्या एका बाबाचा आसरा घेतला होता. याबद्दलची माहिती भय्यू महाराज यांच्या जवळच्या व्यक्तींनाही नव्हती. मोबाइल वर तो बाबा आणि भय्यू महाराज बोलायचे. जेव्हा राजस्थानमधील तो बाबा मध्य प्रदेशला यायचा तेव्हा एका बंद खोलीत ते भेटायचे. एका वर्षात दोन वेळा भय्यू महाराज व तो बाबा भेटले होते. त्यावेळी तणावत असल्याचं भय्यू महाराज यांनी त्या बाबाला सांगितलं होतं. दरम्यान, तणावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं भय्यू महाराज यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं. मंगळवारी भय्यू महाराज यांच्या आत्महत्येशी संबधीत फॉरेन्सिक रिपोर्टही समोर आली. रिपोर्टनुसार, भय्यू महाराज यांनी 15 ते 20 मिनिट विचार करून स्वतःवर गोळी झाडली. दरम्यान, भय्यू महाराज आर्थिक संकटांचा सामना करत होते. त्यांनी 10 लाख रूपये कर्जही घेतलं होतं. काही व्यवसायिक व आश्रमात येणाऱ्या प्रसिद्ध गायिकेकडूनही त्यांनी पैसे घेतल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे. 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज