शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Bhagwant Mann: भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:41 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे.

चंडीगड - आम आदमी पक्षाचा (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सत्तेवर येताच मोठ-मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली. त्यानंतर, माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, असे एका पाठोपाठ एक निर्णय आप सरकारने घेतले. त्यानंतर, आता गरीब व सर्वसामान्यांसाठीचा निर्णय पंजाब सरकारने जाहीर केला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रेशन दुकानांवर लागणाऱ्या रांगांची झंडटच संपुष्टात आणली आहे. गरिबांना रेशन दुकानावर रांग लावून धान्य घ्यावं लागत होतं. मात्र, आता रेशन दुकानदारांकडूनच घरपोच धान्य देण्यात येणार आहे. घरपोच रेशन देण्याचा मोठा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांवरच ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही या योजनेची घोषणा केली होती. मात्र, केंद्र सरकारने दिल्लीत या योजनेला स्थगिती दिली होती. आता, पंजाबमध्ये आप सरकारने ही योजना घोषित केली असून याची अंमलबजावणी करण्याचे काम मान सरकारला करायचं आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या योजनेत रेशन कार्डधारकांना गव्हाच्या ऐवजी गव्हाचे पीठ देण्यात येणार आहे. तसेच, पूर्वीपेक्षा स्वच्छ आणि चांगला तांदुळ लोकांना घरपोच मिळणार आहे. त्यासाठी, बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब होणार असून केवळ लाभार्थ्यांनाच हे धान्य मिळेल.   दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, दिल्लीत या योजनेला केंद्रातील भाजप सरकारने स्थिगिती दिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच, घोषणेनंतर आता पंजाब सरकारला या योजनेवरील अंमलबजावणीसाठी काम करायचं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मानBJPभाजपाPunjabपंजाबchandigarh-pcचंडीगढ़