शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Bhagwant Mann : मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांची सुरक्षा काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:55 IST

Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदीगड : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री  (CM) होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सर्व माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा (Security) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मनप्रीत सिंग बादल, भारत भूषण आशु, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचनसिंग, नवज्योत कौर सिद्धू आणि नवज्योत सिंग सिद्धू अशी काही नावे ज्यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे. या यादीनुसार राजा वडिंग यांच्याजवळ सर्वाधिक सुरक्षा आहे. दरम्यान, 369 पोलीस कर्मचारी आणि कमांडोना नेत्यांच्या सुरक्षेतून हटवण्यात येणार आहे. 

वेणू प्रसाद यांची प्रधान सचिवपदी नियुक्तीभगवंत मान यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार अमरजीत सिंह यांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. याशिवाय, भगवंत मान यांनी वेणू प्रसाद यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती केली. ते 1991 च्या बॅचचे आयएएस आहेत.

16 मार्चला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथदरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टीला (AAP)प्रचंड बहुमत मिळाले आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) 16 मार्च रोजी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२PunjabपंजाबAam Admi partyआम आदमी पार्टीNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू